Tuesday, November 30, 2010

R Mall (Group Activity) - Report - Sharda Jitekar

आर मॉल (संघ कार्यक्रम) - अहवाल

- शारदा जितेकर

आमच्या शोधकार्याच्या विषया संबंधीत २७ नोव्हेंबरला आम्ही सर्वांनी 'आर मॉल' ला जाण्याचे ठरविले. आम्हां सर्वांना सांभाळणे एकट्या आनंदना कठीण होते म्हणुन त्यांच्या मावशी ही आमच्या मदतीसाठी आल्या. जाताना आनंद, अखील, अशोक, यास्मीन, मनिषा टॅक्सीतुन व मावशीसह मी व चंदा एका रिक्षातुन मॉलमध्ये गेलो.

तीथे गेल्यावर तीथल्या सीक्युरिटीच्या मदतीने आम्ही मॉलमध्ये शिरलो. आम्हाला बसवुन आनंद तिकीटे आणायला गेले त्या वेळेत मी तीथे थोडे फिरुन पाहिले तर तेथील सर्व वस्तु खुप महाग होत्या. तीथे फिरताना मला आपोआप वर खाली होणार्‍या पायर्‍या दिसल्या. त्याबघुन मला नवल वाटले कारण त्या मी फक्त पिक्चर मध्येच पाहिल्या होत्या.

त्यावर चढुन बघावे असे वाटत होते पण भितीही वाटत होती तेव्हा मावशींनी मला आधार दिल्यावर पायर्‍यांवर चढले. त्याआधी मला घाबरलेली बघुन तीथल्या सीक्युरिटीनी त्या पायर्‍या बटन दाबुन थांबवल्या होत्या व मी चढल्यावर सुरु केल्या होत्या.

मग मी मावशींना धरुन २ ते ३ वेळा पायर्‍यांनी वर खाली ये-जा केली तेव्हा मी काही तरी नवीन केल्याचे मला जाणवले. नंतर आम्ही हॉलमध्ये पिक्चर पहायला गेलो. तीथे जाण्याचे कारण म्हणजे आमच्यासाठी मॉलमध्ये काय-काय सुविधा आहेत ते पहायचे होते. तीथे आत गेल्यावर अपंगांची व्हीलचेअर बसेल अशी खास जागा नसल्याने आनंदने मनिषा व यास्मिनला हॉलच्या खुर्च्यांवर बसविले. जर तीथे व्हीलचेअर साठी वेगळी जागा असती तर उचलावे लागले नसते. पिक्चर पाहुन मग आम्ही जेवलो आणि आईस्क्रीम खाल्ले. मग जसे जाताना गेलो तसेच येताना पण आलो.

No comments:

Post a Comment

Kindly post your comments, your comments are valuable to us.