Thursday, October 28, 2010

PUKAR office is now Accessible to 'All'

PUKAR office is now Accessible to 'All'

- Anand Vaidya

Accessibility is a general term used to describe the degree to which a product, device, service, or environment is available to as many people as possible. Accessibility can be viewed as the "ability to access" and possible benefit of some system or entity. Accessibility is often used to focus on people with disabilities or special needs and their right of access to entities.

Most existing and new housing, even in the wealthiest nations, lack basic accessibility features unless the designated, immediate occupant of a home currently has a disability. However, there are some initiatives to change typical residential practices so that new homes incorporate basic access features such as zero-step entries and door widths adequate for wheelchairs to pass through. There are seven basic requirements for any multifamily/commercial building, they are as follows :

1) An accessible building entrance on an accessible route,
2) Accessible common and public use areas,
3) Doors usable by a person in a wheelchair,
4) Accessible route into and through the dwelling unit,
5) Light switches, electrical outlets, thermostats and other environmental controls in accessible locations,
6) Reinforced walls in bathrooms for later installation of grab bars, and
7) Usable kitchens and bathrooms.  (Source : Wikipedia)

Similar thing happened to my team members. We were facing lot of problems whenever we wanted to get in or come out of PUKAR office for workshops/meetings/open house. As the entrance had 3 steps on the outer side and absolutely no steps inside. So for my team members who use wheelchair, 3 or 4 people required to lift their wheelchair up and then get them inside the office. Which was very problematic for the wheelchair user himself and also for people who were helping him. So we politely requested Rajendra/Sunil/Bharat on 1 or 2 occasions to make the entrance more accessible for us.
this is the entrance of PUKAR office, not
accessible to persons using wheelchair
On 24th October...I & Manisha, who uses wheelchair, came for the workshop at PUKAR office. And as we headed towards the entrance, we could not believe our eyes. It was a very pleasant surprise for both of us. We just kept staring at the entrance. There was a wooden ramp at the entrance, on both sides. I took Manisha inside the office & I did not require any help. Both of us were very happy. We just couldn't stop saying thanks to PUKAR.
wooden ramp instead of 3 steps, now easily
accessible to persons using wheelchair
First PUKAR gave my team an opportunity to learn something new. Now they have ensured that my team faces no obstacles or difficulties in learning those things. Sincere thanks to PUKAR from my whole team. And we also specially thank Rajendra Jadhav, Sunil Gangavane & Bharat Gangurde without them this would not have been possible as they took all the initiative & ensured that the office entrance is accessible to 'all'.

Whether the PUKAR office is totally accessible or not is another issue. What is more important that PUKAR took the first step to make their office entrance accessible to all.

" I am delighted that PUKAR's Youth Fellowship Team took your suggestion seriously and ensured an easy access to you. Inclusivity means doing ALL THIS!
It is PUKAR's privilege to be able to work with youth like your group whose determinations and  resolute attitudes are much to learn from for each of us. We are thnkful that you joined ur endeavor and you will illuminate it by your research. " - Dr Anita Patil-Deshmukh (Executive Director-PUKAR)

खरे तर RAMP ची ही गरज फार पूर्वीच आमच्या लक्षात यायला हवी होती, ती तुम्ही आमच्या निदर्शनास आणून दिली, THANK YOU SO MUCH ...
सर्व समावेशकता, सर्वांना समाज संधी आणि मागे राहिलेल्यांना विशेष संधी हे पुकार च्या महत्वाच्या VALUES आहेत. आणि अशा संधी उपलब्द करून देणे हे प्रक्रियेतील FACILITATOR म्हणून आम्ही आमचे कर्तव्य समजतो. " - Rajendra Jadhav (Project Director-PUKAR Youth Research Fellowship)

Tuesday, October 12, 2010

Guddu Sapre - A True Human Being

Guddu Sapre - A True Human Being

- Anand Vaidya

Guddu
He is just 19 years old. He was abandoned by his mother in a train when he was just 2 years old. He considers himself an orphan. He spent his last 17 years in government hostels for orphans battling all odds & difficulties. He told me once that whenever a crime took place nearby, the police used to come to their orphans hostel, round some of them up, file fake charge sheets against them. Only last year he got an opportunity to work as 'barefoot researcher' at PUKAR. Topic of his research was 'difficulties faced by orphans'. This year he & his group has chose to research on 'can middle-class boys & girls be friends with each other ?'.

It was Sunday, 26 September. I along with my team members Chanda & Sharda had come for the Open House at the PUKAR Office. Guddu was also there. In the morning session, some fellows were asked to become volunteers for an activity that PUKAR staff had planned. Activity required volunteers to make pairs, one member will blindfold the other member, both members will keep a safe distance of 5 feet between them, blindfolded member will walk around the office only listening to the instructions from his partner. As activity was interesting everyone, including us, went outside to see how each pair was performing.

As Chanda & Sharda walk with the help of crutches we were walking very slowly and were left behind. I also wanted to take some photos of the activity but could not leave my team members alone. Guddu saw this. He just asked me for my camera. He started taking photos of us walking & also of the activity. He took some 20 nice photos.

I started thinking to myself, this 19 year old boy, raised in an orphanage, could think of my problem & took initiative to take photos for me. Whether the act is small or big, does not matter to me. What matters to me is that he thought and he did it. That is why I called him 'A True Human Being'.

I immediately wrote an email praising his kind act and forwarded it to Executive Director of PUKAR Dr Anita Patil-Deshmukh, Project Director of PUKAR Youth Fellowship Mr Rajendra Jadhav, Project Coordinators Mr Sunil Gangavane, Mr Kapil Chavan, Mrs Amrapali Dalvi, Office Manager Mr Bharat Gangurde, Guddu Sapre & to all my team members. Below is the email that I wrote :

"Dear All,

As you are aware my team members are coming for every workshop/open house. As they are physically disabled I have to come along with them. All these workshops/open house I strongly noticed one thing that I had to ask for help from other youth fellows, or if they are told to make groups they always made groups among themselves only.

The incident I am referring is when I came with my team members Chanda Jagde & Sharda Jitekar for Open House on 26 September, 2010. We were given an activity in the morning session where all of us would walk around Pukar office.

All of us went outside. But as Chanda & Sharda had to walk with the help of calipers, we were walking slowly. I also wanted to take snaps of the activity. On seeing this, Guddu himself came up to me & told me that he will take snaps for me. And he took some 20 snaps of us walking & the activity that was going on.

The point of sharing this story with you :

Guddu has been raised in an Orphanage. He himself thought & helped me take snaps from my camera. I did not have to ask him 'can you please help me?'.

Whereas other youth fellows, who are raised by their respective parents, did not even think that I might need some help.

I sincerely appreciate Guddu for his own initiative to offer help...my many many thanks to you Guddu.

Regards,
Anand Vaidya & Team"

First reply that I got was from Executive Director of PUKAR Dr Anita Patil-Deshmukh. She wrote in her reply

"Dear Anand:

Thank you so much for sharing this experience ans for appreciating Guddu's offer to help. Guddu it was very thoughtful of uyou have offered to help! I appreciate that kind and humane spirit much

As PUKAR Team we perhaps need to make concerted efforts to make other youth fellows more aware and less scared of rendering help to you and being more aware.

Thanks again for sharing this eye opening experience.

anita"

Project Director Mr Rajendra Jadhav wrote me a very interesting & thoughtful reply,

"प्रिय आनंद,
आपण OPEN HOUSE किंवा WORKSHOP मध्ये जेव्हा - जेव्हा लहान लहान ग्रुप बनविण्यास सांगतो तेव्हा तेव्हा ते ग्रुप DIFFERENTLY ABLE मेंबर ला वगळून बनविणे जातात/ बनतात. याचे व्यक्तीशः मला खूप वाईट वाटते. मनाला खूप वेदना होतात. मात्र आपण ज्या व्यवस्थेचे घटक आहोत अशा समाजाला हि माणसे अडचण वाटते. परिस्थिती वाईट आणि गंभीर आहे. मात्र आपण यात काही बदल घडवू शकू, अशी अशा आणि खात्री आहे. अखेर उम्मीद पे दुनिया कायम है! 
माणूस जे दुःख भोगतो त्याची त्याला जाणीव असते. गुड्डू ने आपल्या १८-२० वर्षांच्या आयुष्यात जे भोगले आहे. त्यामुळे त्याला बहिष्कृत जीवनाची तीव्र जाणीव आहे, ती जाणीव त्या तुलनेत जे सुरक्षित जीवन जगले आहेत, त्यांना होत नाही. आपण सारे एका मुक्कामाचे प्रवासी एका जागेवरून प्रवास सुरु करतो तेव्हा आपल्यातले काही साथी मागे राहून गेले आहेत याची साधी जाणीवही होवू नये हे दुर्दैव आहे. 
या बाबतची संवेदना जर आपण एक वर्षाच्या प्रक्रियेत निर्माण करू शकलो तर आपण मोठ यश मिळवलं अस मला वाटत. 
परिस्थिती भीषण आहे मात्र बदल घडेल अशी अशा आहे आणि आपण नक्की एवढा बदल घडवू शकू याची खात्री ही आहे आणि याच साठी  तर आपण एकत्र आलो आहोत. 
गुड्डू मध्ये तर गेल्या दोन वर्षाच्या प्रक्रियेत जे बदल आणि प्रगल्भता आली आहे, त्याचा मला खरेच अभिमान वाटतो. 
तू स्वतः देखील गटातील  सदस्यांना ज्या प्रकारची मदत देत असतो ते तुझ्यातील माणसाची ओळख देत असते. 
तुझ्या निमित्ताने या प्रवासात एक खराखुरा सोबती मिळाला, असे वाटते.

राजेंद्र"

My team member Ms Manisha Bhurke wrote,

"प्रिय आनंद,
तू पाठवलेली गुड्डू सप्रेने स्वःमनाने  केलेल्या मदतीची मेल वाचून मी तुला फोन केला; पण खर तर तुझ्याप्रमाणेच आम्ही सर्वानीही  मेल पाठवून त्याचे आपल्या टीमच्यावतीने आभार मानून कौतुक करणेही आमचे जाणीवपूर्वक कर्तव्य आहे कारण हल्ली जेथे मागून मदत मिळत नाही तेथे गुड्डूने ती न सांगता, न मागता स्वतःहून केली ही गोष्ट खरच प्रशंसा करून वाखाणण्यासारखी आहे तसेच अशाच छोट्या-छोट्या गोष्टीतून माणुसकीची जाणीव होते ती टिकवण्यासाठी आपणही आपल्यापरीने त्याची मनापासून कदर करून त्वरित त्याची पोचपावती देणेही तितकेच जरुरी आहे जे तू आमच्यावतीने केलेस व दुसऱ्याच्या कर्तुत्वाची जाहीरपणे प्रशंसा करून दाद दयायलाही खूप मोठे मन लागते जे तुझ्याकडे असल्याचा गेल्या ७-८ महिन्यातील माझा स्वःनुभव आहे तर गुड्डूने स्वःप्रेरणेने मदत केल्याबद्दल व तू त्याने केलेल्या मदतीची सहृदय जाण ठेवून आमच्यावतीने त्याचे आभार मानल्याबद्दल आपल्याटीमतर्फे तुम्हा दोघांचे शतशः  आभार; असे म्हणता येईल की तुम्ही दोघ पुकारचा जो माणसातील विचारशक्ती व माणुसकी जागवण्याचा उद्देश आहे त्याचे प्रतिनिधित्व करून तो उद्देश सफल होत असल्याचे प्रतिक आहात.
पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे व पुकारच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार.
मनिषा"

And finally just read what Guddu himself had to say in his reply to me about all this,

"Dear Anand Vaidya & team
अरे आभार मानण्याचा प्रश्न च येत नाही मी आपल काम केल या पुढे thanks नको बोलु जर अस बोललास तर अस वाटत कि परक्याला मदत केली 
THANKS YAAR......
Regards 
Guddu Sapre"

What else can I say about you Guddu...you are a true human being!

Below are some of the photos that Guddu clicked from my camera :

participants enjoying the activity
myself, Chanda & Sharda


participants enjoying the activity

participants enjoying the activity

Monday, October 11, 2010

Group Meeting 10 October - Report


संघ बैठक - अहवाल :

- मनिषा भुर्के

तारिख - रविवार दि. १० ऑक्टोबर २०१०

वेळ - सकाळी ११ ते संध्याकाळ ५ पर्यंत

स्थळ - एम.बी.ए. पवई केंद्र

उपस्थित सदस्य - आनंद वैद्य, आमोद वैद्य, मनिषा भुर्के, अशोक गुप्ता, अखिल बि'श्रिराम, यास्मिन शेख, चंदा जागडे, शारदा जितेकर

रिसोर्स पर्सन -
१) श्री. सी. आर. बालसुब्रमण्यम - संस्थापक व संचालक एम.बी.ए. फाउंडेशन, माजी-संचालक ईंडिया टाईम्स ग्रुप

२) सौ. मिनाक्षी बालसुब्रमण्यम - संस्थापक व संचालक एम.बी.ए. फाउंडेशन, हेलन केलर पुरस्कार विजेत्या

उद्दिष्ट - आम्ही निवडलेल्या शोधमोहिमेच्या विषया वर अधिक सखोल व उपयुक्त माहिती मिळवणे.

बैठकीचा सारांश -
मी, अखिल व अशोक
अखिल, अशोक, आमोद, चंदा,
यास्मिन, शारदा आणि मी










सकाळी ११ ते १२ या वेळेत आम्ही मागील सभांचा व 'पुकार' मधे झालेल्या कार्यशाळेचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच काही सांघिक व्रुत्ती वाढवणारे खेळ खेळलो. अशोक व यास्मिन यांनी काही शायरी म्हणुन दाखविल्या. स्व. प्रसाद घाडी या ८०% शारिरीक दृष्ट्या अपंग असणार्‍या मुलाची जिद्द, जबर ईच्छाशक्ती, महत्वाकांक्षा व असामान्य कौशल्य दाखविणारा एक लघु चित्रपट बघितला.
श्री. व सौ. बालसुब्रमण्यम
सर व मॅडमना स्वतःचा परिचय करुन 
देताना यास्मिन
अशा रितीने प्रारंभिक १ तास मनोरंजक ज्ञानार्जनात गेल्यावर ठीक १२ वाजता श्री. सी. आर. बालसुब्रमण्य (सर) व सौ. मिनाक्षी बालसुब्रमण्यम (मॅडम) आमच्या बैठकीत सहभागी झाले. माझा, चंदा व शारदाचा सर व मॅडमशी अतिशय जवळचा संबंध कारण त्यांनीच स्थापन केलेल्या एम.बी.ए. संस्थेत आम्ही आमचे आयुष्य व्यतीत करतो आहोत. अखिल तर त्यांचाच मुलगा. 'पुकार' च्या निमित्ताने आनंदचा पण सर व मॅडमशी चांगला परिचय होता. गटातील आमोद वैद्य, अशोक गुप्ता, यास्मिन शेख, योगेश पांचाळ व रोहन शिंत्रे वगळता सर्व सदस्यांचा सर व मॅडमशी परिचय होता. यापैकी योगेश व रोहन गैरहजर असल्याने उर्वरित तिघांनी आपआपला परिचय दिला. मॅडमनी अशोक व यास्मिनला त्यांना त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत आलेल्या अडचणी व अनुभवांबद्दल विचारले.

एकमेकांशी परिचय झाल्यानंतर सरांनी 'पुकार' संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय या विषयी थोडक्यात माहिती विचारली. सर्वप्रथम अशोकने पुकार विषयी त्याला जी माहिती होती ती सांगितली. यावर अधिक खुलासा करित आनंदने सांगितले की, 'पुकार तळागाळातील अशिक्षित-शिक्षित गोरगरीबांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देऊन सर्वांना विचार करायला भाग पाडून प्रत्येक गोष्टीतील लहान सहान बाबतीमागील सकारण शोध घेण्यास भाग पाडून विचार करायला लावते. येथे व्यक्तिंमधे जात-धर्म गरिब-श्रीमंत शिक्षित-अशिक्षित असा भेदभाव न करता सर्वांना समान हक्क व संधी उपलब्ध करुन देते'.

यानंतर सरांनी स्वत:बद्दल माहिती सांगितली की त्यांनी कुठे कुठे नोकरी केली, अखिलच्या संगोपनाच्या दरम्यान त्यांना कौंटूबिक-सामाजिक काय अनुभव आले व मिनाक्षी मॅडमसह त्यांचे या कार्यक्षेत्रात कसे पदार्पण झाले. अखिलच्या निमित्ताने म्हणजे त्याच्या भावी आयुष्याच्या प्रगतीसाठी मिनाक्षी मॅडम सरांना दिल्लीला एकटे सोडून अखिल सह मुंबईला कशा आल्या व त्यांना सुनिल-नर्गिस दत्त अनुदानित मिथू अलूर संस्थापित-संचालित 'ऍडाप्ट' या संस्थेत संगणक प्रशिक्षिका म्हणून कामाला लागल्या. जिथे त्यांनी अपंगाना कोणत्या प्रकारची व कशा तर्‍हेची कशी व कोठून कोठून कामे मिळतील. त्या नेहमी याच विचारात गर्क असायच्या. दरम्यान काही दिवसानी सरांचीही टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई कार्यालयात बदली झाली तेव्हा त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन अलूर मॅडमची अपंग मुलगी मानिनीला आपल्याच कार्यालयात कसे कामाला लावले व त्याचा अंत शेवटी कसा झाला अशा आठवणी सांगितल्या.

सर व मॅडमच्या शब्दात सांगायचे झाले तर एम.बी.ए. म्हणजे 'म्यूचिअली बेनिफिशिअल ऍक्टीविटी' तत्वावर GODS म्हणजे 'Group Of Disabled' ना एकत्र घेऊन सहकार्य व सहकारी योजनेखाली सक्षम व सुदृढ लोकांचे कमीत कमी सहाय्य घेऊन आपसांतच एकमेकांच्या सहकार्याने सामुहिकरित्या काम करुन एक दुसर्‍या शारिरीक-मानसिक कमजोरीवर मात करुन आपले कार्य साध्य करुन घ्यायचे जेणे करुन कोणाला आपल्यातील व्यंगाची जाणीव होऊन खंत वाटू नये व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वाभिमानाने जगता यावे.

आमच्या विषया संबंधी माहिती सांगताना त्यांनी सह्ज-साध्य प्रवेशासह ईतर सोयी-सुविधा, दळण-वळणाची सोय या बरोबर लोकांच्या मानसिकते वर जास्त जोर दिला. त्यांनी असे म्हटले की सरकारची धोरणे-कायदे असले तरी त्यांचा अपंगाना पाहिजे तसा उपयोग अथवा फायदा होत नाही त्याच्या मागचे मुख्य कारण अपंग व्यक्तींना नोकरी अथवा रोजगार देण्याबाबतीत लोकांची असलेली मानसिकता. अपंगांना शिक्षण घेताना येणार्‍या अनंत अडचणी व पालकांची पण आपल्या अपंग पाल्याला शिकविताना 'तो/ती शिकुन तरी काय करणार आहे' अशी मानसिकता, यामुळे बहुतेक अपंग व्यक्ती ह्या अल्प-शिक्षित असतात. शॉपिंग मॉल मधे जेथे किमान शैक्षणिक पात्रतेची अट नसेल व एका जागी बसुन काम करण्याची सोय असेल अश्या नोकर्‍या अपंगाना दिल्या गेल्या पहिजेत असे त्यांचे ठाम मत होते. उदाहरण म्हणुन त्यांनी मॉलच्या संरक्षण विभागात मॉल मधे सर्वत्र लावलेल्या सी.सी.टी.व्ही. मधुन दिसणार्‍या संशयास्पद हालचालींवर बारिक लक्ष ठेवणे व त्या ताबडतोब वरिष्ठांच्या नजरेत आणुन देणे असे काम अपंग व्यक्तींना मिळू शकते असे सांगितले. अथवा एखादे Xerox Center किंवा Mobile Recharging Center स्वयंरोजगार म्हणुन अपंगाना चालविता येऊ शकते असेही आम्हास सुचविले.

परंतू या सर्वात मोठी अडचण ती म्हणजे लोकांची मानसिकता, अपंग व्यक्ती काहिच करु शकत नाही ही भावना. यावर उपाय म्हणुन त्यांनी आम्हा सर्वांना असे सुचविले की तुम्ही पथ नाट्ये सादर करुन विविध प्रकारचे अपंग व्यक्ती एकत्र येऊन सामुहिकपणे सहकारी पद्धतीने कोणत्याही प्रकारचे काम सक्षमपणे कसे करु शकतात हे लोकांच्या निर्दशनास आणुन द्यावे. अशा प्रकारे लोकांना हळू हळू कळु लागेल की अपंग व्यक्ती देखिल अनेक कामे करु शकतात जर आपण त्यांना योग्य संधी उपलब्ध करुन दिली तर.
सर व मॅडमशी बोलताना आनंद
असेच बोलणे चालू असताना मॅडमनी आनंदला असे विचारले की तुम्हाला जर एखाद्या अपंग व्यक्तीला नोकरी देयची असेल तर तुम्ही त्या व्यक्तीमधे काय बघाल. या प्रश्नाला उत्तर देताना आनंद असे म्हणाला की मी त्याचे आधी शिक्षण बघीन, मग त्याच्यामधे काय क्षमता आहेत, मग त्याच्या योग्यतेनुसार त्याला नोकरी देण्याचा प्रयत्न करीन. यावर मॅडमनी असे सांगितले की शिक्षण हे तितके महत्वाचे नाही, तर त्या व्यक्ती मधे काय क्षमता आहेत हे जाणुन घेणे जास्त महत्वाचे आहे. हे पटविण्यासाठी यास्मिन चे उदाहरण दिले. यास्मिन हि कधीच शाळेत नाही गेली पण तरी तिला साधा जमा-खर्चाचा व्यवहार करता येतो. त्यामुळे ति एखाद्या मॉल मधे कॅश काऊंटर वर बसुन काम करु शकते. हा मुद्दा आनंद व आम्हा सर्वांना तंतोतंत पटला.

अशा प्रकारे एक तास ठरलेली बैठक ही तब्बल दिड ते दोन तास चालली. जेवणाची वेळ झाल्या कारणाने सर व मॅडमनी आमचा निरोप घेतला. आम्ही सर्वांनीच त्यांना आमच्यासोबत जेवणासाठी आग्रह केला परंतु त्यांचा दुसर्‍या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आधीच ठरला असल्यामुळे त्यांनी पुढील वेळेस आमच्यासोबत नक्की जेवणार असे आम्हाला आश्वासन दिले.
मी, आनंद व आमोद जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेताना
सर व मॅडमचा निरोप घेऊन आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. आनंदच्या आई व मावशीने सर्वांसाठी पनिर मक्खनवाला व कोशिंबीर करुन पाठवली होती. चंदा व शारदानी स्वतः पोळ्या व वरण-भाताची सोय केली होती. अशाप्रकारे सुग्रास जेवणाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढील बैठकी विषयी व एकंदर या महिन्यामधे करावयाच्या गोष्टींविषयी चर्चा केली, काही खेळ खेळलो व गप्पा गोष्टी केल्या. बैठकीचा शेवट हा यास्मिनने आणलेल्या खिरीचा आस्वाद घेत झाला.
यास्मिन तिच्या स्कुटर वर, सोबत शारदा

बैठकीत घेतलेले निर्णय -
१) २ ते ३ सदस्यांचा गट करुन प्रत्येक गटानी जवळच्या शॉपिंग मॉलला भेट देऊन तेथे त्यांना काय निर्दशनास आले ते लिहावे.
२) अशोक व आनंद यांनी 'ऍडाप्ट' या संस्थेतील शाळेच्या मुख्याधापिका सौ. संगिता जगत्यानी यांची भेट घेऊन आपल्या शोधकार्याच्या विषया संबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी त्यांची मुलाखत घ्यावी.

पुढील बैठकीची तारिख - शनिवार, ३० ऑक्टोबर २०१०