Monday, October 11, 2010

Group Meeting 10 October - Report


संघ बैठक - अहवाल :

- मनिषा भुर्के

तारिख - रविवार दि. १० ऑक्टोबर २०१०

वेळ - सकाळी ११ ते संध्याकाळ ५ पर्यंत

स्थळ - एम.बी.ए. पवई केंद्र

उपस्थित सदस्य - आनंद वैद्य, आमोद वैद्य, मनिषा भुर्के, अशोक गुप्ता, अखिल बि'श्रिराम, यास्मिन शेख, चंदा जागडे, शारदा जितेकर

रिसोर्स पर्सन -
१) श्री. सी. आर. बालसुब्रमण्यम - संस्थापक व संचालक एम.बी.ए. फाउंडेशन, माजी-संचालक ईंडिया टाईम्स ग्रुप

२) सौ. मिनाक्षी बालसुब्रमण्यम - संस्थापक व संचालक एम.बी.ए. फाउंडेशन, हेलन केलर पुरस्कार विजेत्या

उद्दिष्ट - आम्ही निवडलेल्या शोधमोहिमेच्या विषया वर अधिक सखोल व उपयुक्त माहिती मिळवणे.

बैठकीचा सारांश -
मी, अखिल व अशोक
अखिल, अशोक, आमोद, चंदा,
यास्मिन, शारदा आणि मी










सकाळी ११ ते १२ या वेळेत आम्ही मागील सभांचा व 'पुकार' मधे झालेल्या कार्यशाळेचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच काही सांघिक व्रुत्ती वाढवणारे खेळ खेळलो. अशोक व यास्मिन यांनी काही शायरी म्हणुन दाखविल्या. स्व. प्रसाद घाडी या ८०% शारिरीक दृष्ट्या अपंग असणार्‍या मुलाची जिद्द, जबर ईच्छाशक्ती, महत्वाकांक्षा व असामान्य कौशल्य दाखविणारा एक लघु चित्रपट बघितला.
श्री. व सौ. बालसुब्रमण्यम
सर व मॅडमना स्वतःचा परिचय करुन 
देताना यास्मिन
अशा रितीने प्रारंभिक १ तास मनोरंजक ज्ञानार्जनात गेल्यावर ठीक १२ वाजता श्री. सी. आर. बालसुब्रमण्य (सर) व सौ. मिनाक्षी बालसुब्रमण्यम (मॅडम) आमच्या बैठकीत सहभागी झाले. माझा, चंदा व शारदाचा सर व मॅडमशी अतिशय जवळचा संबंध कारण त्यांनीच स्थापन केलेल्या एम.बी.ए. संस्थेत आम्ही आमचे आयुष्य व्यतीत करतो आहोत. अखिल तर त्यांचाच मुलगा. 'पुकार' च्या निमित्ताने आनंदचा पण सर व मॅडमशी चांगला परिचय होता. गटातील आमोद वैद्य, अशोक गुप्ता, यास्मिन शेख, योगेश पांचाळ व रोहन शिंत्रे वगळता सर्व सदस्यांचा सर व मॅडमशी परिचय होता. यापैकी योगेश व रोहन गैरहजर असल्याने उर्वरित तिघांनी आपआपला परिचय दिला. मॅडमनी अशोक व यास्मिनला त्यांना त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत आलेल्या अडचणी व अनुभवांबद्दल विचारले.

एकमेकांशी परिचय झाल्यानंतर सरांनी 'पुकार' संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय या विषयी थोडक्यात माहिती विचारली. सर्वप्रथम अशोकने पुकार विषयी त्याला जी माहिती होती ती सांगितली. यावर अधिक खुलासा करित आनंदने सांगितले की, 'पुकार तळागाळातील अशिक्षित-शिक्षित गोरगरीबांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देऊन सर्वांना विचार करायला भाग पाडून प्रत्येक गोष्टीतील लहान सहान बाबतीमागील सकारण शोध घेण्यास भाग पाडून विचार करायला लावते. येथे व्यक्तिंमधे जात-धर्म गरिब-श्रीमंत शिक्षित-अशिक्षित असा भेदभाव न करता सर्वांना समान हक्क व संधी उपलब्ध करुन देते'.

यानंतर सरांनी स्वत:बद्दल माहिती सांगितली की त्यांनी कुठे कुठे नोकरी केली, अखिलच्या संगोपनाच्या दरम्यान त्यांना कौंटूबिक-सामाजिक काय अनुभव आले व मिनाक्षी मॅडमसह त्यांचे या कार्यक्षेत्रात कसे पदार्पण झाले. अखिलच्या निमित्ताने म्हणजे त्याच्या भावी आयुष्याच्या प्रगतीसाठी मिनाक्षी मॅडम सरांना दिल्लीला एकटे सोडून अखिल सह मुंबईला कशा आल्या व त्यांना सुनिल-नर्गिस दत्त अनुदानित मिथू अलूर संस्थापित-संचालित 'ऍडाप्ट' या संस्थेत संगणक प्रशिक्षिका म्हणून कामाला लागल्या. जिथे त्यांनी अपंगाना कोणत्या प्रकारची व कशा तर्‍हेची कशी व कोठून कोठून कामे मिळतील. त्या नेहमी याच विचारात गर्क असायच्या. दरम्यान काही दिवसानी सरांचीही टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई कार्यालयात बदली झाली तेव्हा त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन अलूर मॅडमची अपंग मुलगी मानिनीला आपल्याच कार्यालयात कसे कामाला लावले व त्याचा अंत शेवटी कसा झाला अशा आठवणी सांगितल्या.

सर व मॅडमच्या शब्दात सांगायचे झाले तर एम.बी.ए. म्हणजे 'म्यूचिअली बेनिफिशिअल ऍक्टीविटी' तत्वावर GODS म्हणजे 'Group Of Disabled' ना एकत्र घेऊन सहकार्य व सहकारी योजनेखाली सक्षम व सुदृढ लोकांचे कमीत कमी सहाय्य घेऊन आपसांतच एकमेकांच्या सहकार्याने सामुहिकरित्या काम करुन एक दुसर्‍या शारिरीक-मानसिक कमजोरीवर मात करुन आपले कार्य साध्य करुन घ्यायचे जेणे करुन कोणाला आपल्यातील व्यंगाची जाणीव होऊन खंत वाटू नये व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वाभिमानाने जगता यावे.

आमच्या विषया संबंधी माहिती सांगताना त्यांनी सह्ज-साध्य प्रवेशासह ईतर सोयी-सुविधा, दळण-वळणाची सोय या बरोबर लोकांच्या मानसिकते वर जास्त जोर दिला. त्यांनी असे म्हटले की सरकारची धोरणे-कायदे असले तरी त्यांचा अपंगाना पाहिजे तसा उपयोग अथवा फायदा होत नाही त्याच्या मागचे मुख्य कारण अपंग व्यक्तींना नोकरी अथवा रोजगार देण्याबाबतीत लोकांची असलेली मानसिकता. अपंगांना शिक्षण घेताना येणार्‍या अनंत अडचणी व पालकांची पण आपल्या अपंग पाल्याला शिकविताना 'तो/ती शिकुन तरी काय करणार आहे' अशी मानसिकता, यामुळे बहुतेक अपंग व्यक्ती ह्या अल्प-शिक्षित असतात. शॉपिंग मॉल मधे जेथे किमान शैक्षणिक पात्रतेची अट नसेल व एका जागी बसुन काम करण्याची सोय असेल अश्या नोकर्‍या अपंगाना दिल्या गेल्या पहिजेत असे त्यांचे ठाम मत होते. उदाहरण म्हणुन त्यांनी मॉलच्या संरक्षण विभागात मॉल मधे सर्वत्र लावलेल्या सी.सी.टी.व्ही. मधुन दिसणार्‍या संशयास्पद हालचालींवर बारिक लक्ष ठेवणे व त्या ताबडतोब वरिष्ठांच्या नजरेत आणुन देणे असे काम अपंग व्यक्तींना मिळू शकते असे सांगितले. अथवा एखादे Xerox Center किंवा Mobile Recharging Center स्वयंरोजगार म्हणुन अपंगाना चालविता येऊ शकते असेही आम्हास सुचविले.

परंतू या सर्वात मोठी अडचण ती म्हणजे लोकांची मानसिकता, अपंग व्यक्ती काहिच करु शकत नाही ही भावना. यावर उपाय म्हणुन त्यांनी आम्हा सर्वांना असे सुचविले की तुम्ही पथ नाट्ये सादर करुन विविध प्रकारचे अपंग व्यक्ती एकत्र येऊन सामुहिकपणे सहकारी पद्धतीने कोणत्याही प्रकारचे काम सक्षमपणे कसे करु शकतात हे लोकांच्या निर्दशनास आणुन द्यावे. अशा प्रकारे लोकांना हळू हळू कळु लागेल की अपंग व्यक्ती देखिल अनेक कामे करु शकतात जर आपण त्यांना योग्य संधी उपलब्ध करुन दिली तर.
सर व मॅडमशी बोलताना आनंद
असेच बोलणे चालू असताना मॅडमनी आनंदला असे विचारले की तुम्हाला जर एखाद्या अपंग व्यक्तीला नोकरी देयची असेल तर तुम्ही त्या व्यक्तीमधे काय बघाल. या प्रश्नाला उत्तर देताना आनंद असे म्हणाला की मी त्याचे आधी शिक्षण बघीन, मग त्याच्यामधे काय क्षमता आहेत, मग त्याच्या योग्यतेनुसार त्याला नोकरी देण्याचा प्रयत्न करीन. यावर मॅडमनी असे सांगितले की शिक्षण हे तितके महत्वाचे नाही, तर त्या व्यक्ती मधे काय क्षमता आहेत हे जाणुन घेणे जास्त महत्वाचे आहे. हे पटविण्यासाठी यास्मिन चे उदाहरण दिले. यास्मिन हि कधीच शाळेत नाही गेली पण तरी तिला साधा जमा-खर्चाचा व्यवहार करता येतो. त्यामुळे ति एखाद्या मॉल मधे कॅश काऊंटर वर बसुन काम करु शकते. हा मुद्दा आनंद व आम्हा सर्वांना तंतोतंत पटला.

अशा प्रकारे एक तास ठरलेली बैठक ही तब्बल दिड ते दोन तास चालली. जेवणाची वेळ झाल्या कारणाने सर व मॅडमनी आमचा निरोप घेतला. आम्ही सर्वांनीच त्यांना आमच्यासोबत जेवणासाठी आग्रह केला परंतु त्यांचा दुसर्‍या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आधीच ठरला असल्यामुळे त्यांनी पुढील वेळेस आमच्यासोबत नक्की जेवणार असे आम्हाला आश्वासन दिले.
मी, आनंद व आमोद जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेताना
सर व मॅडमचा निरोप घेऊन आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. आनंदच्या आई व मावशीने सर्वांसाठी पनिर मक्खनवाला व कोशिंबीर करुन पाठवली होती. चंदा व शारदानी स्वतः पोळ्या व वरण-भाताची सोय केली होती. अशाप्रकारे सुग्रास जेवणाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढील बैठकी विषयी व एकंदर या महिन्यामधे करावयाच्या गोष्टींविषयी चर्चा केली, काही खेळ खेळलो व गप्पा गोष्टी केल्या. बैठकीचा शेवट हा यास्मिनने आणलेल्या खिरीचा आस्वाद घेत झाला.
यास्मिन तिच्या स्कुटर वर, सोबत शारदा

बैठकीत घेतलेले निर्णय -
१) २ ते ३ सदस्यांचा गट करुन प्रत्येक गटानी जवळच्या शॉपिंग मॉलला भेट देऊन तेथे त्यांना काय निर्दशनास आले ते लिहावे.
२) अशोक व आनंद यांनी 'ऍडाप्ट' या संस्थेतील शाळेच्या मुख्याधापिका सौ. संगिता जगत्यानी यांची भेट घेऊन आपल्या शोधकार्याच्या विषया संबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी त्यांची मुलाखत घ्यावी.

पुढील बैठकीची तारिख - शनिवार, ३० ऑक्टोबर २०१०

No comments:

Post a Comment

Kindly post your comments, your comments are valuable to us.