Tuesday, November 30, 2010

R Mall (Group Activity) - Report - Chanda Jagde

आर मॉल (संघ कार्यक्रम) - अहवाल

- चंदा जागडे

मी 'पुकार' ची मेंबर झाल्यापासून मला खुप काही नवीन-नवीन शिकायला मिळत आहे. सुरुवातीला मी माझ्यापासुन म्हणजे मी माझी स्वत:बद्दलची माहिती लहानपणापासुनच्या आठवणी बाहेर काढता आल्या आणि जे काय चांगले-वाईट अनुभव मी बायोग्राफीतुन व्यक्त केले. दुसरी गोष्ट म्हणजे 'पुकार' च्या मिटींग होतात त्या पण आम्हाला लिहुन काढण्याचा एक अनुभव मिळतो. आम्ही मॉलमध्ये जायच ठरवल कारण अपंगांना तीथे काही कामासाठी जागा मिळू शकते का व तीथे मॉलवाले काम देऊ शकतात का हे जाणुन घ्यायचे होते. पण त्यासाठी आमच्यासाठी काय सुविधा आहेत याची पहिली चौकशी केली पाहिजे.

त्या निमित्ताने आम्ही एक दिवस ठरवल आणि एक दिवस मिटींग ठेवली व कोणता दिवस सर्वांसाठी योग्य आहे याची चर्चा केली. पहिल्यांदा सर्वांना रविवार हवा होता पण मग रविवारी खुप गर्दी असते म्हणुन आम्ही रविवार सोडून शनिवारी जायचे ठरवले. शनिवार २७ नोव्हेंबर २०१० ला जायचे नक्की झाले.

शुक्रवारी रात्री आम्ही तिघी बसुन चर्चा करत होतो की आम्ही एवढे सर्व अपंगंच आहोत आणि फक्त आनंद वैद्य एकटेच असे मदत करणारे मग ते एवढ्यांना कसे सांभाळणार पण त्यांची मात्र हिंम्मत होती की जाऊया काही नाही मी आहे, 'मैं हुं ना' अस म्हणत आम्हाला हिंम्मत देतच होते.

शनिवारी आम्ही सकाळी तिघीही लवकर तयार झालो आणि आनंद व त्यांच्या मावशी पण आल्या. त्यांना पाहुन खुप आनंद झाला की मावशीपण आम्हाला मदतीसाठी आल्या. मग मी, शारदा व मावशी एका रिक्षात तर बाकी सर्व एका टॅक्सीत गेले. आम्ही सर्व 'आर मॉल' ला पोहचलो.

तेथे चढण्यासाठी रॅम्प व पायर्‍या होत्या. आतमध्ये आम्ही आमच्या बॅगा व पर्सेस तपासणीसाठी दिल्या. आनंद तीथल्या सीक्युरिटी लोकांना आमच्याबद्दल माहिती देत होते मग ते लोक आमच्या मदतीसाठी आले व विचारु लागले की आम्हाला काही मदत हवी आहे का. आम्ही लवकर पोहचल्यामुळे अर्धा तास आम्ही खालीच गप्पा मारत होतो व मॉल बद्दल माहिती घेत होतो.

मॉलमध्ये व्हिलचेअर वापरणारी व्यक्ती पण नोकरी करु शकते. तीथे खुप काही छोटी-छोटी व महत्वाची कामे आहेत. जस एखाद्या व्हिलचेअर वापरणार्‍या व्यक्तीला चेकींगचे काम दिले तर ती व्यक्ती ते काम करु शकते कारण तीथे जी लोक चेकींगच काम करत होती ती एका जागेवर उभं राहुनच करत होती. हे काम एक अपंग पण करु शकतो कारण तीथे चार ते पाच जण एकत्र मिळुन एकाच जागी ते काम करत होते.

मॉलमध्ये व्हिलचेअर वापरणार्‍यांसाठी बाथरुमची सुविधा नाही आहे, ती असायला हवी. आम्ही सिनेमा बघण्यासाठी गेलो तीथे पण तीथल्या लोकांनी आम्हाला जी हवी आहे ती मदत केली. थेटर मध्ये आम्ही सर्व एक-एक जण आत मध्ये गेलो पण काळोख असल्याने आम्हाला खास करुन मला पायर्‍या उतरायला खुप भिती वाटत होती. आनंदने त्या लोकांना सांगीतले की आम्हा सर्वांना वरच्याच सीट्स देऊ शकाल तर आम्हाला बर पडेल. तर त्यांनी आम्हाला वरच्याच सीट्स दिल्या मग आम्ही सर्व जण एका रांगेत बसलो.

पुर्ण सिनेमा शांतपणे पाहिला, खुप आनंद झाला. मग सिनेमा संपल्यावर पण मॉलवाले आम्हाला मदतीसाठी आले. आम्ही तीथल्या कॅन्टीन मध्ये जेवण केले. थोडा वेळ फिरलो मग आम्ही सर्वांनी आईस्क्रीम खाल्ले व घरी येण्याची तयारी केली. मी खुप आभारी आहे 'पुकार'ची व आनंदच्या मावशींची, त्यांच्यामुळे आम्हाला मॉलमध्ये जाता आलं, फिरता आलं.

No comments:

Post a Comment

Kindly post your comments, your comments are valuable to us.