आर मॉल (संघ कार्यक्रम) - अहवाल
- मनिषा भुर्के
वार्षिक २०१०-११ साठी 'पुकार' आयोजित युवा संशोधन प्रकल्प उपक्रमःनिमित्ताने आमच्या संघातील १० पैकी ८ जणांच्या उपस्थितीत सांघिक शोधकार्य विषयासंदर्भात आनंद वैद्यंच्या नेतृ्त्वाखाली व त्यांच्याच संयोजनेने शनिवार दि. २७ नोव्हेंबर २०१० ला सकाळी १० ते सायंकाळ ३:३० दरम्यान मनोरंजन व निरिक्षणाद्वारे अवलोकन या सारखा दुग्धशर्करेचा अनपेक्षित अनोखा न भूतो न भविष्यःती असा समन्वय संगम साधून आम्ही ७ अपंग व आमच्या मदतीसाठी धावून आलेल्या उज्वला मावशी असे एकूण ९ जणांनी 'आर मॉल' शॉपिंग सेंटरला दिलेल्या धावत्या तरी आश्चर्यजनक मनोहरी भेटीचा संक्षिप्त सारांश.
सकाळी ८ च्या दरम्यान आनंद वैद्य व त्यांच्या मावशी घराबाहेर पडल्यापासून यास्मिन व अशोकला टॅक्सीने घेऊन पवईला ९:१५ ला पोहचल्यावर मी, चंदा, शारदा व अखिल त्यांच्यात सामील झालो व आम्ही सर्व १ टॅक्सीत आनंद व माझ्यासह अखिल, यास्मिन व अशोक तर १ रिक्षांतून उज्वला मावशीसह शारदा, चंदा मुलूंडच्या 'आर मॉल' शॉपिंग सेंटर कडे निघालो. एकमेकांशी गप्पा गोष्टी, छेड छाड करत हसत खेळत इच्छित स्थळी १० वाजता कधी व कसे पोहचलो ते आमचे आम्हांलाही कळले नाही.
आम्हां ६ जणांना टॅक्सी व रिक्षांतून उतरवण्यासाठी आनंद व उज्वला मावशींना टॅक्सी ड्रायव्हर सह 'आर मॉल' च्या सुरक्षा रक्षकांनी मोलाची मदत केली. मॉलच्या आत प्रवेश करताच आम्हां सर्वांना त्यांनी सोयीस्कर व्यवस्थित आरामात बसण्यासाठी जागा करुन दिली. सिनेमा सुरु व्हायला अर्धा-पाऊण तास उशिर असल्याने आनंद सिनेमाचे आधिच काढून ठेवलेले तिकीटे आणायला गेले व बाकी सर्व मॉलच्या तळमजल्यावरील सुशोभित सुरचित अद्यावत दुकानांचे निरिक्षण करण्याच्या दृष्टीने सर्वत्र फेर फटका मारत असताना सभोवतालच्या अकल्पित अचंबित व आकर्षिक करणार्या आधुनिक गोष्टी पाहताना प्रत्येकाचे जणू भान हरपले. मॉलच्या प्रवेश द्वाराच्या दर्शनी भागातच असलेल्या स्वयंचलित यांत्रिक मत्स्यपेटीतील रंगीबेरंगी शोभिवंत मासे खरे की खोटे यात आम्हां सर्वांचे दुमत होते त्यामुळे ते खरे असल्याचे तेथील कर्मचारी वर्गाकडून खातरजमा करुन घेतल्यावरच सर्वांचे समाधान झाले.
आमच्यातील काही जण तर प्रथमच अशा शॉपिंग सेंटर मध्ये आले होते. त्यामुळे तेथील अद्यावत आधुनिक यांत्रिक वातावरणाचे नयनसुख घेत मनसोक्त आनंद लुटत असताना सर्वांचे लक्ष अकस्मातपणे स्वयंचलित यांत्रिक पायर्यांकडे वेधले गेले. सिनेमा-मालिकासारख्या प्रसिद्ध प्रसार माध्यमामध्ये फक्त बघितल्यामुळे त्याचा प्रात्यक्षिकाद्वारे स्वानुःभव घेण्याची आम्हां सर्वांनाच अनावर इच्छा झाली होती पण शारिरीक परस्वाधिनतेच्या असामर्थ्यामुळे आमच्या पैकी फक्त शारदाने आस्वाद घेण्याचे भीत भीत का होईना अनुभवासाठी धाडस केले. त्या पायर्यांनी खालून वर जाण्याचे तिच्या या धाडसी प्रयत्नाला मॉलच्या व्यवस्थापकीय सुरक्षा रक्षक कर्मचार्यांनी विद्युत प्रवाह तात्पुरता खंडित करुन व उज्वला मावशींनी तिच्या मानसिक आधारासाठी तिच्या पाठीशी उभे राहून तिला प्रोत्साहन दिले व त्यामुळे तिला नव्हे आम्हां सर्वांनाच त्या स्वयंचलित पायर्यांच्या प्रात्यक्षिताचा अनुभव घेता आला.
यास्मिन व चंदा-शारदा यांनी असा अद्यावत मॉल प्रथमच पाहिला होता. त्यांनी मॉल बघितले होते पण ते छोटे होते व इतके अद्यावत आधुनिक पद्धतीचे नव्हते. अशोकच्या म्हणण्याप्रमाणे त्याने तर त्याचे बाह्यरुपी विलोभनीय दर्शनच घेतले होते. माझ्या बाबतीत सांगायचे तर कामाच्या ठिकाणाहून कित्येकदा सभांच्या निमित्ताने मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये जाणे येणे होते. जेथे या सर्व आधुनिक अद्यावत व यांत्रिक सुख-सुविधायुक्त सोयीस्कर व्यवस्था असते तरी एक प्रकारे आनंद होता की आपण आपल्या सहकार्यांबरोबर आपल्याच सारख्या समदुःखितांच्या समस्यांचा व हक्कांचा पाठपुरावा कसा करता येईल याचा शोध लावताना आपल्याला कोणकोणत्या आवश्यक बाबी ध्यानात घेऊन त्याचा उपयोग कुठे कसा किती प्रमाणात करुन घेऊ शकू हाच विचार मनात घोळत असताना आनंद तिकीटे घेऊन आले व आम्हां सर्वांना एक-एक करुन पाळी पाळीने उज्वला मावशीसह तेथील कर्मचार्यांच्या मदतीने लिफ्टने वरच्या मजल्यावर घेऊन आले.
तिथे आम्ही सर्वांनी चहापानाचा आस्वाद घेत तेथील 'डिसेबल्ड फ्रेंडली' रचनात्मक बांधकामासह तेथील अनुकूल सहाय्यक कर्मचारी वर्ग व व्यवस्थापना बद्दल चर्चा करत असतानाच योगेशचे आगमन झाले. त्याला अकस्मात बघून आनंदला वगळून माझ्यासह सर्वांनाच आश्चर्ययुक्त आनंद झाला. कारण काही वैयक्तिक कौटूंबिक काम असल्याने तो येणार नसल्याचे आम्हांला कळले होते. त्यानेच सुचवल्याने खरे तर आम्ही सिनेमा बघण्याच्या निमित्ताने 'आर मॉल' कितपत 'डिसेबल्ड फ्रेंडली' अर्थात आम्हां अपंगासाठी सोयीस्कर आहे की नाही याची पाहणीद्वारे खात्री करण्यासाठी आलो होतो. योगेश आल्यावर अखिल, आनंद व उज्वला मावशींच्या मदतीने आम्ही सिनेमागृहात प्रवेश केला पण आमची तिकीटे मधल्या रांगेत असल्याने तेथील व्यवस्थापकांनी आमच्यासाठी एकदम मागील रांगेत बसण्याची व्यवस्था करुन देताना त्या रांगेत बसलेल्यांना पुढच्या रांगेत जाऊन बसण्याची विनंती केली व आम्हांला आमच्या आसनांवर बसवण्यासाठीही आनंद व मावशीना सर्वतोपरी सहाय्य केले.
माझ्यासह यास्मिन व योगेश व्हिलचेअर वाल्यांपैकी मला व यास्मिनला आनंदनी मावशीच्या मदतीने तेथील खुर्चीवर बसवून आमच्या व्हिलचेअर मागे दुमडून ठेवल्या तेथील व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनानुसार आणी योगेश स्वत:च्या व्हिलचेअरवरच बसला. अशाप्रकारे एकूण आम्ही ९ जण 'ब्रेक के बाद' हा 'मॉर्निंग शो' बघायला बसलो. 'ब्रेक के बाद' हा सिनेमा आधारित होता तो भिन्न-भिन्न वृत्ती-प्रवृत्तीच्या प्रेमी युगूलांची. एक भावनांना महत्व देऊन स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालणारा तर एक अति महत्वाकांक्षी ज्यापुढे भावनांची जाणीव असूनही स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काहीही करण्यास मागे पुढे न पाहणारा याच कारणास्तव होणारी वादनिर्मिती व ताटातुट हे चित्रिकरण होते मध्यांन्हतरांपर्यंतचे. मग आम्ही सर्वांनी मध्यांन्हतरांत यास्मिन ने आम्हां सर्वांसाठी आणलेल्या बिस्किटांवर ताव मारला. त्यानंतरच्या उर्वरित सिनेमाच्या भागांत या प्रेमी युगूलांना आपल्या चुकीची प्रचीती येत जाते व विपरित परिणामांच्या जाणीवेने दोघांच्या स्वभावात हळूहळू बदल घडत जातो व नित्यनियमांप्रमाणे सिनेमाच्या शेवटी दोघांमध्ये एकोपा निर्माण होऊन शेवट गोड झाला.
सिनेमा संपल्यावर आम्ही जसा सर्वांच्या मदतीने सिनेमागृहात प्रवेश केला तसेच सर्वजण आनंद, अखिल व मावशीच्या मदतीने बाहेर पडलो व स्नेहभोजनाचा आनंद लुटण्यासाठी एकत्रित जमलो. एकमेकांशी 'आर मॉल' च्या सहाय्यक व्यवस्थापने संबंधी चर्चायुक्त सल्लामसलतीसह एकमेकांची चेष्टा मस्करी करत दिलेल्या पनीर टिक्काच्या ऑर्डरची वाट पहात जे आम्ही सर्वानी एकमतांनी मागवले होते त्याबरोबर आनंद, योगेश, चंदा आळीपाळीने अंगत-पंगतच्या गमतीने एकत्रित उपभोगित स्नेहभोजनाच्या निमित्ताने सर्वांचे फोटो काढत होते. सर्वांचे चेहरे आधीच आनंदाने इतके ओतपोत भरले होते की ते ओसंडून वाहत होते कारण आम्हां प्रत्येकातील हर एक जण कोणी ना कोणी कोणती ना कोणती गोष्ट पहिल्यांदा करत होता कोणी घरातून एकटे बाहेर पडले होते तर कोणी इतका प्रशस्त नानाविध व नाना तर्हेने सुसज्जित मॉल प्रथमच बघत होते तर कोणी सिनेमागृहात सिनेमा बघण्याचा आनंद उपभोगत होते ज्यामुळे एकप्रकारे सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होण्यास मदत होते. सर्वांची जेवणे आटोपल्यावर आनंद, मावशी व अखिलच्या मदतीने आम्हां सर्वांना घेऊन आईस्क्रिम खाण्यासाठी खाली आले.
सर्वांनी आईस्क्रिमचा आस्वाद घेत या मॉल भेटीचा आमच्या शोध कार्यासाठी कसा व कुठे उपयोग करुन घेता येईल यावर स्वानुभवित सविस्तर चर्चा करत असताना यास्मिनने अजून पर्यंतच्या तिच्या आयुष्यात प्रथमच सिनेमागृह बघितल्याचे तेही घरच्यांच्या नकळत असे सांगितले. तिकडनं जाऊन ती घरी सांगणार होती सिनेमा बघितल्याचे कारण त्यांच्या संस्कृतीत या सर्व गोष्टी बसत नसल्याने त्यांच्या कुटूंबातील कोणीही त्या केलेल्या नाहीत असे ती म्हणाली. आईस्क्रिमची चव जीभेवर घोळवत आम्ही परतीचा रस्ता धरला. जसे आलो होतो तसे रिक्षांत चंदा, शारदासह मावशी व टॅक्सीत अशोक, अखिल, यास्मिनसह आनंद व मी आणि योगेश जसा स्वतः आला तसा स्वतःच जाणार होता. माझ्यासह चंदा, शारदा व अखिलला सायं. ४:१५ पर्यंत पवईला आणि आनंद व मावशी अशोक व यास्मिनला घेऊन टॅक्सीने सायं. ६ पर्यंत घरी पोहचले. हा दिवस आम्हां सर्वांसाठी खरोखरच अविस्मरणीय आहे.

hello manisha, khup chhan watle.maushina maza namaskar saang.
ReplyDelete